Centre for Modeling and Simulation
Savitribai Phule Pune University All Models Are False, Some Are Useful

भालचंद्र पुजारी

Bhalchandra  Pujari
UGC - Assistant Professor    

bspujari @
cms.unipune.ac.inPhone
(+91 20).2569.0842
(+91 20).2560.1448
Extension : 207
Campus: 1448

खरडवही

​कधीतरी उत्साह आला की मराठीतून काहीतरी लिहितो. (बहुतांश वेळा ते काहीच्याकाही ह्याच प्रकारात मोडते!)​ ​ ह्यापूर्वी "कॅनडा हो विठ्ठलू …"​ ​ नावाचा ब्लॉग टाकायचो. आता ह्यापुढे इथेच खरडत जाऊ म्हणतोय, बघू!​

मुखपृष्ठाकडे


भय इथले संपत नाही

(ग्रेसांची जाहीर माफी मागून)
–--------------------------
भय इथले संपत नाही
मज रोज प्रवास दुचाकीचा
मी संध्याकाळी करतो
मग हिशोब हाड-जोडांचा


तो ट्रक सुसाट आडवासा
कोपऱ्यात स्पर्शुनी गेला
मध्यान्ही मेंदूत माझ्या
जणू सूर्यच तो गरगरला


ते रोड दगड धोंड्यांचे
ती धरती पाहे घसराया
खड्ड्यातुन उठतो आपण
खड्ड्यात पुन्हा आपटाया


अंगातील हाडे अवघी
ठणकवती सांधे कधीचे
हे सरता संपत नाही
वाहन हाकणे उद्याचे!मूळ कवी: ग्रेस
विडंबक : डिस्ग्रेस (भालचंद्र पुजारी)
९ मार्च २०१४
About | People | Programmes | ResearchReports
Alumni | Announcements | WebMail | Contact© 2004-17 Centre for Modeling and Simulation
Valid HTML 4.01!